प्रसिद्ध ज्वेलर्सला खंडणी मागितल्या प्रकरणी मंगलदास बांदल यांना अटक

शहरातील एका प्रसिद्ध ज्वेलर्स व्यावसायिकाला 50 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखेने शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना कोंढवा परिसरातुन अटक केली. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने काही दिवसांपूर्वी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. याआधी गुन्हे शाखेने आशिष पवार, रमेश पवार आणि रूपेश चौधरी यांना अटक केली आहे.

प्रसिद्ध ज्वेलर्स मालकाच्या घरी कामाला असताना एका कामगाराने महिलेचा व्हिडिओ काढला होता. त्यानंतर संबंधित व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिघांनी त्यांना 50 कोटींची मागणी केली होती. संबंधित ज्वेलर्स व्यावसायिकाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत मंगलदास बांदल यांचाही खंडणीत हात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) शिवाजी पवार यांनी बांदल यांना कोंढवा येथील घरातून अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या