महेश आहेर यांच्याविरोधात कारवाई करा! जितेंद्र आव्हाड यांची पोलिसांकडे पत्राद्वारे मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील आमदार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याचा कट समोर आला आहे. या संदर्भातील एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. तिहार तुरुंगामध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केल्याची कबुली देणारी ठाणे महापालिकेतील वादग्रस्त सहायक आयुक्त महेश आहेर यांची ही ऑडिओ क्लिप आहे. या ऑडिओ क्लिपमुळे ठाण्यात प्रचंड खळबळ माजली आहे. या कथित ऑडियो क्लिपच्या अनुषंगाने आमदार आव्हाड यांनी वर्तकनगर पोलिसांना एक पत्र लिहिले असून यामध्ये त्यांनी आहेर याच्याविरूद्ध योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे.