शरद पवारांसमोरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

74
sharad-pawar-satara

सामना प्रतिनिधी । फलटण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माढा मतदारसंघात राष्ट्रवादीत असलेली गटबाजी उघड झाली आहे. शरद पवार यांच्या भाषणादरम्यानच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हमरीतुमरी करत गोंधळ सुरू केला. शांत राहण्याचे आवाहन करूनदेखील गोंधळ कायम होता. शरद पवार स्टेजवर बोलण्यासाठी उभे असतानाच हा प्रकार झाला. पण गोरे-म्हेत्रे गटाचे कार्यकर्ते माघार घेत नसल्याने पवार शांत उभे होते.

माण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर गोरे आणि ककिता म्हेत्रे यांच्यात आमदारकीसाठी स्पर्धा सुरू असल्याचे बोलले जाते. फलटण येथील सजाई कार्यालयात माढा लोकसभे अंतर्गत फलटण कोरेगाव आणि माण खटाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा ‘कार्यकर्ता संवाद’ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ही घटना घडली.

आपली प्रतिक्रिया द्या