… म्हणून ‘हे’ 3 दिवस कायम लक्षात राहतात, पवारांनी वाढदिवशी सांगितले गुपित

6496

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. 12 डिसेंबर, 1940 रोजी जन्मलेल्या पवारांनी वयाची 79 वर्षे पूर्ण केली असून 80 व्या वर्षात पदार्पण केले. पवारांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अभीष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींची उल्लेख केला.

आपली बांधिलकी शेवटच्या माणसाशी… समाजातील तरुण पिढीशी आहे त्यामुळे त्यांच्यासाठी काम करायला हवा, असा विश्वास शरद पवार यांनी बळीराजा कृतज्ञता दिनानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. यावेळी त्यांनी तीन तारखांचा विशेष उल्लेख करत या तारखा माझ्या कायम लक्षात राहतील असे गुपितही सांगितले.

माझा जन्मदिवस माझ्या लक्षात राहात नाही परंतु माझ्या आईचा जन्मदिवस म्हणून लक्षात रहातो. माझ्या आईचा वाढदिवसही 12 डिसेंबरला असतो. माझ्या पत्नीचा जन्मदिवस 13 डिसेंबर आहे. ज्येष्ठ अभिनेते व माझे जवळचे मित्र दिलीपकुमार यांचा वाढदिवस 11 डिसेंबर आहे, असे सांगत या तीन तारखांचे गुपित शरद पवार यांनी उघड केले.

#SharadPawar शरद पवारांबाबत ‘या’ 10 गोष्टी माहित आहेत का?

आईबाबत बोलताना शरद पवार म्हणतात, माझ्या आईने कष्टाने आम्हाला शिकवले. 1936 साली ती लोकल बोर्डावर निवडून आली. महिलांसाठी काम केले. मुलींचे शिक्षण व्हावे असा तिचा आग्रह होता याची माहितीही शरद पवार यांनी सभागृहात सांगितली. तसेच सार्वजनिक जीवनात यश मिळते. संकट येतात. त्यावेळी दोन वर्ग माझ्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे माझी आई आणि दुसरा माझा सर्वसामान्य माणूस आहे, असेही शरद पवार म्हणाले.

sharad-pawar-new2

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला, शिवसेना नेते कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. शिवाय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव पितांबर मास्टर, प्रदेशाध्यक्ष व कॅबिनेट मंत्री जयंत पाटील, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते आमदार अजित पवार, ज्येष्ठ नेते व कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनील तटकरे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रीय प्रवक्ते व मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक, आमदार दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, आमदार धनंजय मुंडे, आमदार हसन मुश्रीफ,राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान,आमदार राजेश टोपे, आमदार जितेंद्र आव्हाड आदींसह पक्षाचे सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

sharad-pawar-new2

आपली प्रतिक्रिया द्या