पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘भिक मागो’ आंदोलन

24

सामना प्रतिनिधी । लातूर

देशभरात पेट्रोल, डिझेलच्या दरांनी उच्चांकी गाठली आहे. इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या इंधन दरवाढीच्या निषेधार्त गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भिक मागो आंदोलन केले. तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध करुन निदर्शने केली.

वाढत्या पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्त सामन्य जनता रोष प्रकट करत आहे. लातूरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भिक मागो आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात निषेद्धात्मक घोषणा दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या