बंदोबस्तासाठी पोलीस पाहिजे तर त्यांना खुर्च्या तरी द्या, पवारांनी आयोजकांना झापले

1762
sharad-pawar

पोलिसांना तासंतास बंदोबस्तासाठी उभे करणाऱ्या आयोजकांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज चांगलेच फटकारले. पोलिसांना बसायला खुर्ची देण्याचे बंधन आयोजकांच्यावर घालावे, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली. एका ट्रस्टच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते, या विषयीचे पत्र महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याना दिले असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.

सांगली जिल्ह्याच्या मिरजेतील एका शैक्षणिक संकुलाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या वेळी बंदोबस्तासाठी अकरा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत जागेवर उभ्या असणाऱ्या पोलिसांना बघून शरद पवारांनी पोलिसांच्या विषयी काळजी व्यक्त केली. राज्यातील अनेक कार्यक्रमात पोलिसांना कार्यक्रमाच्या अगोदर आणि कार्यक्रम संपेपर्यंत उभे राहावे लागते. त्यामुळे आयोजकांना पोलीस बंदोबस्त हवा असल्यास त्यांच्यावर पोलिसांना खुर्ची देण्याचे बंधन घालण्यात यावे, असे पवार यांनी यावेळी सूचित केले.

pawar

आपली प्रतिक्रिया द्या