महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. पण .या योजनेमुळे होमगार्डच्या भत्त्यात वाढ करता येणार नाही असे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे. लाडकी बहीण योजना ही मत विकत घेण्यासाठी आणलेली योजना आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
राज्य सरकारला होमगार्डचा भत्ता वाढवण्यासाठी पत्र लिहिले होते. पण राज्यात अनेक योजनांसाठी निधी खर्च झाल्याने होमगार्डचा भत्ता वाढवता येणार नाही असे लेखी उत्तर सरकारने दिले आहे. यावर आव्हाड यांनी टि्विट करून म्हटले आहे की, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुनदानानंतर आता होमगार्ड यांना मंजूर केलेला भत्ता थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशा असंख्य सरकारी योजना, भत्ते अन कर्मचाऱ्यांचे पगार थांबले असतील. फक्त मतांसाठी आणलेल्या योजनांमुळे, सरकारी दीड हजारात मत विकत घ्यायची योजना, हे जनतेला न कळण्याएवढी जनता दूधखुळी नाही असेही आव्हाड म्हणाले.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुनदानानंतर आता होमगार्ड यांना मंजूर केलेला भत्ता थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशा असंख्य सरकारी योजना, भत्ते अन कर्मचाऱ्यांचे पगार थांबले असतील. फक्त मतांसाठी आणलेल्या योजनांमुळे, सरकारी दीड हजारात मत विकत घ्यायची योजना, हे जनतेला न… pic.twitter.com/5e5kJKXtL8
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 8, 2024