शरद पवारांच्या फोटोचा अवमान केल्याने राष्ट्रवादीचा संताप

9

सामना प्रतिनिधी । शिरोळ

शिरोळ तालुक्यातील कुरूंदवाड पालिका सभागृहातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो स्टोअर विभागातील अडगळीत टाकण्यात आला होता. फोटोचा अवमान केले प्रकरणी संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेवर धडक मोर्चा काढत मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत निलंबनाची मागणी केली.

शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड पालिका सभागृहात २००१ पासून शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी हा फोटो रंग कामानिमित्त काढण्यात आला. परंतु तो पुन्हा लावला नाही. दरम्यान हा फोटो दोन दिवसांपूर्वी स्टोअर विभागात अडगळीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर याबाबतची तक्रार जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे केल्यानंतर या प्रकरणाबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी नगराध्यक्ष पाटील यांना कारवाईबाबत निवेदन देण्यास पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

दरम्यान यावेळी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले १८जुन२०१६ साली कुरूंदवाड पालिकेत सेवा सुरू केली. त्यादरम्यान पवार साहेबांच्या फोटोबाबत कोणतीच माहिती नव्हती. या फोटोंबाबतचा प्रकार मला आज समजला. पवार साहेबांचा फोटो सभागृहात लावून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या