देशात गुन्हेगारीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक; 2017 मध्ये 10.38 ने गुन्ह्यांची झाली वाढ

216
crime

एनसीआरबी कार्यालयाकडून क्राईन इन इंडियाचा 2017 चा अहवाल गुरुवारी पोलिस आयुक्तालयात सादर करण्यात आला. त्यानुसार देशातील गुन्हेगारीत उत्तरप्रदेशनंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक असून 2017 मध्ये राज्यातील गुन्ह्यांचा आलेख 10.38 ने वाढ झाल्याचे अहवालात नोंद करण्यात आली आहे.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंके, विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेिंसग पाटील, दत्तात्रय मंडलिक, जालिंदर सुपेकर, प्रकाश गायकवाड, आरती बनसोडे यांच्या उपस्थितीतीत महाराष्ट्रातील गुन्हे 2017 अहवालाचे सादरीकरण पोलिस आयुक्तालयात करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम उपस्थित होते.

महाराष्ट्रातील गुन्हे 2017 अहवालानुसार राज्यतील गुन्ह्यांची वस्तुनिष्ठ सांख्यिकी, विवेचन, गुन्हेगारांच्या प्रवाहाचे विश्लेषण, गुन्ह्यांचे नवीन स्वरुप, गुन्ह्यातील वाढ आणि घट इत्यादीविषयी माहिती नमूद करण्यात आली आहे. राज्यात 2017 मध्ये 2 लाख 88 हजार 879 गुन्हे दाखल असून देशभरातील दाखल गुन्ह्यापैकी हे प्रमाण 9.43 टक्के आहे. 2016च्या तुलनेत 2017 मध्ये गुन्ह्यांचा आलेख 10.38 ने वाढला आहे. विशेष व स्थानिक कायद्याप्रमाणे ही वाढ 5.75 टक्के आहे. राज्यभरात दाखल असलेल्या एवूâण गुन्ह्यापैकी 34.37 टक्के गुन्हे आयुक्तालयातंर्गत दाखल आहेत. त्यामध्ये सर्व आयुक्तालयातंर्गत दाखल गुन्ह्यापैकी 39.31 टक्के गुन्हे मुंबईत दाखल आहेत. खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, चोरी अशा गुन्ह्यांचे प्रमाण 236.8 टक्के असून सर्वाधिक गुन्हे प्रमाण अमरावतीत आहे.

महिलांवरील अत्याचाऱ्याच्या गुन्ह्यांमध्ये 2.31 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक मुंबईत ५ हजार ४५३ गुन्हे दाखल आहेत. प्रत्येक एक लाख महिलांमागे ५५.७ टक्के अत्याचाराचे प्रमाण असून त्यामध्ये अमरावती शहराचे सर्वाधिक प्रमाण आहे. अनुसूचित जातीवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये ३.६० टक्क्यांनी घट झाली आहे. तर अनुसूचित जमातीवरील अत्याचाNयाच्या गुन्ह्यात 14.14 टक्यांनी वाढ झाली आहे. त्यामध्ये दोष सिद्ध होण्याचे प्रमाण ३२.४५ टक्के आहे. रस्त्यावरील अपघातांच्या गुन्ह्यामध्ये 23.92 ने घट झाली आहे. दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये 0.61 ने घट झाली आहे. खून आणि खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात महाराष्ट्राचा १४ वा क्रमांक आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात राज्याचा २३ वा क्रमांक आहे. अपहरण व पळवून नेण्यासह हुंडाबळीच्या गुन्ह्यामध्ये राज्याचा 9 वा क्रमांक आहे. तर विनयभंग गुन्हृयामध्ये राज्याचा 10 क्रमांक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

गुन्ह्याचा प्रकार वर्ष 2016 वर्ष 2017 प्रमाण

  • 1 खून 2298 2103 8.53 घट
  • 2 दरोडा 656 643 1.198 घट
  • 3 जबरी चोरी 6030 6451 6.98 वाढ
  • 4 मालमत्ता गुन्हे 80872 111163 36.46 वाढ
  • 5 महिला अत्याचार 31275 31997 2.31 वाढ
  • 6 अनुसूचित जाती 1752 1689 3.60 घट
  • 7 अनुसूचित जमाती 403 464 15.14 वाढ
  • ८ आर्थिक गुन्हे 13008 11758 1.61 घट
  • एकूण गुन्हे 261714 288879७९ 10.38 वाढ
आपली प्रतिक्रिया द्या