कृणाल पंड्याला कोरोनाची लागण, आजचा टी-20 सामना पुढे ढकलला

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला कोरोनाची लागण झाली आहे. कृणालची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर कोलंबोमधील आजचा टी -20 सामना पुढे ढकलण्यात आला आहे. हिंदुस्थान आणि श्रीलंका यांच्यात आज दुसरा टी-20 सामना खेळला जाणार होता. सध्या टीम इंडियाचे सर्व खेळाडू विलगीकरणात आहेत.

तीन टी -20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. पहिल्या टी -20 सामन्यात हिंदुस्थानी संघाने श्रीलंकेला 38 धावांनी पराभूत केले होते. या सामन्यात कृणालने केवळ दोन ओव्हर टाकत 16 रन देऊन 1 विकेट घेतली होती. याशिवाय फलंदाजीत त्याने नाबाद 3 धावा केल्या होत्या.

दरम्यान, दोन्ही संघांतील खेळाडूंच्या चाचण्या निगेटिव्ह आल्यास हा सामना बुधवारी म्हणजेच 28 जुलैला खेळला जाऊ शकतो, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या