हिंदुस्थानातील पहिले ‘गाय मंत्री’ही पराभूत

25

सामना ऑनलाईन । जयपूर

राजस्थान विधानसभा निवडणुकीत हिंदुस्थानातील पहिले आणि एकमेव ‘गाय मंत्री’ ओटाराम देवासी यांना मतदारांनी पराभवाची धुळ चारली आहे. राजस्थानमध्ये मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये होती. मात्र दावासी यांना सिरोही मतदार संघातून काँग्रेसच्या नाही तर एका अपक्ष उमेदवाराने 10 हजार मतांनी पराभूत केले आहे.

राजस्थानमध्ये मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रचारादरम्यान ‘गाय मंत्रालयाची’ स्थापना करणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे वसुंधरा राजे सरकारमध्ये ओटाराम देवासी यांना गाय मंत्रालयाचा कारभार सोपवला होता. हिंदुस्थानातील पहिल्यांदाच अशा प्रकारच्या गाय मंत्रालयाची स्थापना राजस्थान सरकारने केली होती. ओटाराम यांनी राज्यातील मोकाट गायींच्या संवर्धनासाठी नवीन मालमत्ता खरेदीवर 20 टक्के टॅक्स लावला होता. तरी देखील सरकारी गोशाळांमध्ये 500 पेक्षा जास्त गायींचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. त्यामुळे जनतेने ओटाराम देवासी यांना नाकारले आहे. राजस्थानमध्ये जवळपास 20 मंत्र्यांना मतदारांनी नाकारल्याने पराभव पत्कारावा लागला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या