विधानसभेचे अधिवेशन, १०० आमदारांची सुटी

सामना ऑनलाईन । हैदराबाद

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन सुरू असूनही तब्बल १०० आमदार सुटीवर आहेत. लग्नाला जायचे आहे असे कारण देत आमदारांनी सुटीचे अर्ज केले आणि त्यांचे अर्ज मंजुर झाले आहेत. ही घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे.

सध्या आंध्र प्रदेशमध्ये लग्नांचा मोसम सुरू आहे. लग्नाचे मुहूर्त असल्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये येत्या काही दिवसांत तब्बल १ लाख २० हजार विवाह होणार आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना सत्ताधारी तेलगू देसम पक्षाच्या १०० आमदारांनी सुटीसाठी अर्ज केला. आमदारांच्या अर्जाला विधानसभाध्यक्षांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या अंतिम टप्प्यात सभागृहात बहुसंख्य आमदार अनुपस्थित राहणार आहेत. या सगळ्याचा कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असली तरी आमदारांच्या भावनांचा आदर राखून सुटीचा अर्ज मंजुर केल्याचे विधानसभाध्यक्षांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या