
सामना ऑनलाईन । अहमदाबाद
गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात १४ जिल्ह्यांतील ९३ जागांसाठी ६८.७० टक्के मतदान झाले. आज (गुरुवारी) झालेल्या मतदानामुळे ८५१ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात (ईव्हीएम) बंद झाले.
गुजरातेत पहिल्या टप्प्यात ६८ टक्के मतदान
गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात २०१२ मध्ये ७१.३ टक्के मतदान झाले होते. मागच्या वेळेच्या तुलनेत यंदा थोडे कमी झाले आहे.
गुजरातः मतदान यंत्रामधील मते मोबाईलने बदलली जात आहेत?
अंतिम टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, भाजप अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधानांच्या मातोश्री हिरा बेन, शंकर सिंह वाघेला, हार्दिक पटेल यांनी मतदान केले. मतदान केल्यानंतर पंतप्रधान मतदान केंद्रापासून बरेच अंतर चालत गेले. पंतप्रधान ज्या पद्धतीने लोकांमधून चालत गेले त्यावर आक्षेप घेत काँग्रेसने आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप केला.