मणिशंकर अय्यर यांचे काँग्रेसमधून निलंबन

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नीच म्हटले म्हणून काँग्रेसने मणिशंकर अय्यर यांचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित केले आहे. पंतप्रधानांवर टीका करताना मणिशंकर यांनी ‘नीच’ आणि ‘असभ्य’ हे शब्द वापरले होते. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीकेचा भडीमार झाला. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही नाराजी व्यक्त करत मणिशंकर यांना माफी मागण्यास सांगितले होते.

भाजप आणि पंतप्रधानांकडून पातळी सोडून टीका होत असली तरी त्यावर अशा भाषेत प्रत्युत्तर देणे ही काँग्रेसची संस्कृती आणि परंपरा नाही. मणिशंकर यांनी जी भाषा वापरली आहे, त्याबद्दल माफी मागायला हवी, अशा शब्दांत राहुल यांनी मणिशंकर यांना बजावले होते. त्यानंतर मणिशंकर यांनीही माध्यमांपुढे बोलताना माफी मागून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या या स्पष्टीकरणाने पक्षाचे समाधान झाले नसून मणिशंकर यांना थेट कारणे दाखवा नोटीसच बजावण्यात आली आहे. त्यासोबतच मणिशंकर यांचे प्राथमिक सदस्यत्वही काँग्रेसने निलंबित केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या