कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याची जोड हवी! पालकमंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन

453
chhagan-bhujbal

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

चांदवड येथे चांदवड, देवळा, सटाणा तालुक्यांची कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री बोलत होते. कोमॉर्बीड रुग्णांच्या योग्य औषधोपचारावर लक्ष ठेवण्यात यावे. शहरात नव्याने रुग्ण वाढू नये म्हणून सूक्ष्म कंन्टेंनमेन्ट झोन करावेत. तालुक्यामध्ये कायमस्वरूपी ऑक्सिजन बेड्सची निर्मिती करावी.

आरोग्य विभागाने घरोघरी तपासणी करून रुग्णांचा शोध घ्यावा. मृत्यूदर कमी करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार भारती पवार, उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, आमदार दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील, दत्ता शेजुळ, जितेंद्र इंगळे, गट विकास अधिकारी महेश पाटील, पांडुरंग कोल्हे, राजेश देशमुख उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या