लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा होणार? पंतप्रधानांच्या भाषणानंतर देशभरात चर्चा

2425

स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण केले. या भाषणामध्ये त्यांनी लोकसंख्यावाढीच्या गंभीर मुद्दाला हात घातला. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात म्हटले की “आपल्या देशातील लोकसंख्या स्फोट हा येणाऱ्या पिढ्यांसाठी संकटांना आमंत्रण देणारा ठरणार आहे. हा धोका ओळखणारा या देशात एक जागरूक वर्ग आहे. हा वर्ग अभिनंदनास पात्र आहे. छोटे कुटुंब ठेवून त्यांनी एक प्रकारे देशभक्तीच केली आहे.” मोदी यांनी लोकसंख्यावाढीबाबत जनजागरुकता निर्माण होण्यासाठी व्यापक प्रमाणावर चर्चा होणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

लेख : वाढती लोकसंख्या कशी रोखणार?

संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेली आकडेवारी हिंदुस्थानसाठी एक मोठा इशारा आहे . मर्यादित भूभाग असलेल्या हिंदुस्थानला मर्यादित लोकसंख्येशिवाय पर्याय नाही. तेव्हा वाढती लोकसंख्या आणि त्याचे दुष्परिणाम बघता केवळ ‘सबका साथ सबका विकास’ अशी घोषणा देऊन चालणार नाही. लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे.

मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणानंतर देशातील अनेक नागरिकांनी मोदी यांच्या या भूमिकेचे स्वागत करताना प्रश्न विचारला आहे की केंद्र सरकार लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा करणार आहे का? ट्विटरवरून अनेकांनी हा प्रश्न विचारला  आहे. हा प्रश्न अनेकांनी विचारल्यामुळे #populationcontrollaw हा ट्रेंडच सुरू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या