नीना कुलकर्णी यांचे फोटो प्रेम

अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारणाऱया अभिनेत्री नीना कुलकर्णी आता ‘फोटो प्रेम’ या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहेत. यात ‘माई’ या व्यक्तिरेखेची कथा आहे. आपल्या ‘जुन्या फोटो’मध्ये आपण तितकेसे छान दिसत नसल्यामुळे आपल्या मृत्यूनंतर सर्वांना आपला विसर पडेल याची माईला चिंता असते.

माईची कॅमेऱयाची भीती घालविण्याचा आणि शेवटी या भीतीवर मात करून परफेक्ट फोटो काढण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवला आहे. हा चित्रपट आदित्य राठी आणि गायत्री पाटील यांनी संयुक्तपणे लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. नुकतेच चित्रपटाचे ट्रेलर लॉंच करण्यात आले यात माईच्या आयुष्याची झलक दिसते. माई एका मृत व्यक्तीचा लहानपणीचा फोटो पाहून चिंतीत होताना दिसते. तिचे अलीकडील फारसे फोटो उपलब्ध नसल्याने तिच्या मृत्यूनंतर लोक तिला कसे लक्षात ठेवतील, याचा ती विचार करू लागते. त्यानंतर एक परफेक्ट फोटो काढण्यासाठी माईचा उत्कंठावर्धक प्रवास सुरू होतो. या चित्रपटाचा प्रीमियर 7 मे रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओवर होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या