पॅरिस ऑलिम्पिक 2024 नंतर हिंदुस्थानचा स्टार खेळाडू, भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा चमकला. नीरज चोप्राने लॉसने डायमंड लीग 2024 मध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. पहिल्या पाच प्रयत्नांमध्ये संघर्ष केल्यानंतर नीरजने शेवटच्या थ्रोमध्ये 89.49 मीटर भालाफेक करून दुसरे स्थान पटकावले.
डायमंड लीगची स्पर्धा वर्षातून चार ठिकाणी आयोजित केली जाते. या स्पर्धांचे आयोजन दोहा, पॅरिस, लॉसने आणि शेवटी झुरिच येथे केले जाते. सध्या ही स्पर्धा लुसानेमध्ये सुरू असून निरजने या स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले आहे. सुरुवातीला पहिल्या प्रयत्नांमध्ये निरजने 82.10 मीटर अंतरावर भाला फेकला होता. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 83.21 मीटर पर्यंत भाला फेकला. परंतु त्याने शेवटच्या प्रयत्नात सर्वोत्तम कामगिरी करत 89.49 मीटर अंतर कापले. त्यामुळे या हंगामातील ही निरजची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. याआधी निरजने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये याआधी त्याचा 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 89.45 मीटर अंतर मोजले होते.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये निरजने अप्रतिम कामगिरी करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले होते. यावेळी त्याने डायमंड लीग 2024 च्या फायनसल्समध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. ब्रुसेल्स, बेल्जियम येथे होणाऱ्या डायमंड लीग फायनलमध्ये मला खेळायचे आहे. यासाठी मला डायमंड लीगच्या चार लेग सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल आणि गुणतालिकेत टॉप-6 मध्ये स्थान मिळवावे लागेल, असे तो म्हणाला होता.
सध्या डायमंड लीगचे 3 लेग सामने झाले आहेत. आतापर्यंत नीरज चोप्राने 2 लेग मॅचमध्ये 14 पॉइंट्स मिळवले आहेत. लूसाने डायमंड लीगनंतर आता अंतिम फेरीचा अंतिम सामना 5 सप्टेंबर रोजी झुरिच येथे होणार आहे.