तेव्हा टॉयलेटमध्ये बसून मुलीला दूध पाजलंय, अभिनेत्रीने केला खुलासा

1932


बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया ही गेल्यावर्षी आई झाली आहे. 18 नोव्हेंबरला तिने गोंडस अशा मुलीला जन्म दिला. नेहाने मुलीचे नाव मेहेर असे ठेवले आहे. पुढच्या महिन्यामध्ये मेहर एक वर्षाची होणार आहे. याच दरम्यान तिने आई झाल्यानंतरचे एक अभिनेत्री आणि महिला म्हणून काय बदल होतात याबाबत खुलासे केले आहेत.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नेहा म्हणाली, मी विमानाच्या टॉयटेलमध्ये, झाडाच्या मागे बसून, चारचाकी गाडीच्या आत, फोटोशूट सुरू असताना किंवा शूटिंगसाठी क्लोजअप शॉट देताना मेहरला दूध पाजले आहे. परंतु मला असे वाटते की मुलांना दूध पाजण्यासाठी चांगल्या ठिकाणांची आणि सुविधांची आवश्यकता आहे. कारण आपण टॉयलेटमध्ये बसून त्यांना जेवण खावू घालू शकत नाही ना? असा सवालही तिने उपस्थित केला.

ती पुढे म्हणाली की, मुलांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ब्रेस्टफीडिंग अर्थात अंगावर दूध पाजणे सर्वात चांगला पर्याय आहे. परंतु लोकांसाठी जजमेंटल होण्याची आवश्यकता नाही, कारण प्रत्येक महिला किंवा आईसाठी परिस्थिती वेगवेगळी असते.


View this post on Instagram

#Repost @world_of_born with @get_repost ・・・ F R E E D O M T O F E E D •• Last Friday I was attending this beautiful and powerful event #freedomtofeed organised by @nehadhupia and @mommynetwork I strongly support the #freedomtofeed movement as I feel women need more support and care when it comes to breastfeeding. And while I was feeding my baby in this room filled with these inspiring women @pragyadav @sakpataudi @nehadhupia @pooja_and_norah @bombaykidscompany @tarasharmasaluja @kiddiegram {and so many more} who had all gathered together for #freedomtofeed I felt much stronger… Nursing my 2 months old at the same time that I am running a company and having to take care of a 3 years old is surely the most challenging and exhausting experience of my life and there are days where I’m doubting myself and worrying about how this is even possible…. and yes among all the joy and the love there has been lots of tears too… Yet am so lucky and grateful that I have an incredible husband @salilawchat who is the most amazing dad, pampers me, cooks every night and actively participates and shares all the kids related tasks… We definitely need more of him. Please support @nehadhupia #freedomtofeed campaign ❤️ •• @nitisharoraofficial

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia) on

नेहाने नुकतीच #freedomtofeed या चळवळीची सुरुवात केली आहे. या चळवळीद्वारे ती पहिल्यांदा आई होणाऱ्या महिलांच्या, बाळांच्या खाण्या-पिण्याबाबत जनजागृती करत आहे. याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या