Photo – नेहा धुपियाने शेअर केला बाळाचा पहिला फोटो

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि आंगद बेदी यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. नेहा नुकतीच आई झाली असून तिने मुलाला जन्म दिला आहे. नेहा आणि आंगदचे हे दुसरे आपत्य आहे.

neha-dhupia1

दुसऱ्यांदा बाप झाल्याची माहिती आंगद बेदी याने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली होती. आता नेहा धुपिया हिने पहिल्यांदाच बाळाचा फोटो शेअर केला आहे.


View this post on Instagram

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

नेहा धुपिया हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने प्रसुती सुखरुपपणे पार पाडणाऱ्या डॉक्टरांचेही आभार मानले आहेत.


View this post on Instagram

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

नेहाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती बाळाला कडेवर घेऊन उभी असल्याचे दिसते. सोबत तिचा पती आंगद आणि मुलगी मेहरही दिसत आहे.

neha-dhupia3

आपली प्रतिक्रिया द्या