अभिनेत्री नेहा पेंडसेचा गुपचूप साखरपुडा? फोटो व्हायरल

1395

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठी चित्रपट सृष्टीतील बोल्ड अभिनेत्री नेहा पेंडसे हिने तिचा बॉयफ्रेंड शार्दुल सिंह बायस याच्यासोबत साखरपुडा केला असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. नेहाने शार्दुलसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला असून त्या फोटोत नेहाच्या बोटात हिऱ्याची अंगठी दिसत आहे. तसेच ती अंगठी दिसावी अशा प्रकारेच तो फोट क्लिक करण्यात आला आहे. त्यामुळे नेहाचा साखरपुडा झाला आहे की काय असे बोलले जात आहे.


View this post on Instagram

❤️

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

नेहाचा बॉयफ्रेंड शार्दुल हा व्यावसायिक असून गेल्या काही वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत असल्याचे समजते. नेहाने जो फोटो बुधवारी शेअर केला आहे तोच फोटो शार्दुलने काही दिवसांपूर्वी शेअर करत त्यावर ‘हॅपीली एन्गेज्ड’ असे कॅप्शन दिले होते. त्यानंतर जेव्हा नेटकऱ्यांनी शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. त्याने कॅप्शन बदलत ‘हॅपीली इन लव्ह’ असे केले होते. तसेच अभिनेता अभिजीत खांडकेकर याने देखील काही दिवसांपूर्वी नेहासोबतचा एक फोटो शेअर करत त्यावर तिचे अभिनंदन केले होते. मात्र त्याने तिला कशासाठी शुभेच्छा दिल्या ते मात्र गुलदस्त्यात होते.


View this post on Instagram

Happily in love

A post shared by Shardul Singh Bayas (@shardulbayas) on

 

 

आपली प्रतिक्रिया द्या