मराठीतील ‘ही’ हॉट अभिनेत्री दिसू शकते बिग बॉस १२ मध्ये

सामना ऑनलाईन । मुंबई

बिग बॉसच्या १२ व्या सिझनची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिझनमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी असणार आहे, सिझनमध्ये काय नवी बघायला मिळणार यावर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. यंदाच्या सिझनमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील एक हॉट अभिनेत्री देखील दिसणार असल्याची सध्या चर्चा आहे. ही अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे.

neha-pendse

नेहाने मराठी सोबतच हिंदी मालिकांमध्येही तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंदीमध्ये ती पडोसन, ‘मे आय कम ईन मॅडम’, हसरतें, फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा अशा शोमध्ये दिसली आहे. तसेच तिने अनेक मराठी, हिंदी मलयाळम व तेलगू सिनेमे देखील केले आहेत.

यंदाचा सिझन हा जोड्यांमध्ये रंगणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नेहा ही कुणासोबत बिग बॉसच्या घरात कुणासोबत येणार याबाबत तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.