महिलेने शेजाऱ्याला घरी बोलावले, पुढे जे काही झाले त्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही

शेजाऱ्याचा त्रास व्हायला लागल्याने एका महिलेने त्याचा काटा काढायचं ठरवलं. यासाठी तिने त्याला घरी बोलावलं होतं. पुढे जे काही झालं त्यामुळे पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार कर्नाटकातील बंगळुरूमध्ये घडला आहे.

शुक्रवारी संध्याकाळी ए.व्ही.व्यंकटेश यांना निरोप मिळाला. त्यांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या टी.कलावतीने घरी बोलावलं होतं. घरी गेल्यानंतर कलावती यांनी व्यंकटेश यांना ज्युस दिलं आणि चर्चेला सुरुवात केली. या दोघांमध्ये 3 वर्षांपासून खटके उडत होते. वादाचं कारण होतं एका जमिनीचा सौदा. व्यंकटेश यांनी कलावती यांच्याविरोधात कोर्टात खटला देखील दाखल केला होता. याबाबतच चर्चा करण्यासाठी कलावती यांनी त्यांना बोलावलं होतं.

कलावती यांनी व्यंकटेश यांना कोर्टात दाखल असलेला खटल्याबाबत आपण कोर्टाबाहेर तडजोड करू आणि त्याबाबतच चर्चा करायची आहे असं सांगून व्यंकटेश यांना बोलावलं होतं. कलावती यांनी घरी गेल्यानंतर दिलेलं ज्युस व्यंकटेश यांनी प्यायल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं. त्यांना पोटात भयंकर दुखायला लागलं. व्यंकटेश हे वेदनेने कळवळत असताना कलावती यांनी त्यांना सांगितलं की ते खटला मागे घेत नसल्याने त्यांचा काटा काढण्याचं ठरवलं आहे आणि यासाठी ज्युसमध्ये विष मिसळून त्यांना देण्यात आलं आहे.

त्रास होत असतानाही व्यंकटेश यांनी कलावती यांच्या घरातून कसाबसा पळ काढला. त्यांना के.सी. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती आता चांगली असून त्यांना कोणताही धोका नाही असं डॉक्टरांनी सांगितले आहे. पोलिसांनी या प्रकरणी कलावती यांच्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या