सेक्स करताना आरडाओरडा करू नका! शेजाऱ्याच्या चिठ्ठीमुळे जोडपं लाजलं

Photo courtsey - canva.com

ईमेल, मेसेजच्या जमान्यात चिठ्ठी लिहिण्याचं प्रमाण जवळपास शून्यावर आलं आहे. आजकालच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या  जमान्यातही चिठ्ठीची परिणामकारकता किती आहे हे स्कॉटलंडमधील ग्लासगोमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे कळालं आहे. शेजाऱ्याने लिहिलेल्या एका चिठ्ठीमुळे जोडपं लाजलं आहे. स्टीफन कनिंगहॅम असं या जोडप्यातील तरुणाचं नाव आहे.  स्टीफनला ज्या शेजाऱ्याने चिठ्ठी लिहिली आहे त्याचं नाव कळू शकलेलं नाहीये. स्टीफन हा 26 वर्षांचा असून त्यानेच चिठ्ठी सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे.

स्टीफनला त्याच्या शेजाऱ्याने लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलंल की ‘मी मित्रत्वाच्या नात्याने तुला हा सल्ला देतोय की या इमारतीमधील दोन खोल्यांमधील भिंती फार जाड नाहीयेत, या भिंतींपलिकडचा आवाज सहजपणे ऐकता येतो.’ या शेजाऱ्याने पुढे म्हटलंय की ‘तुझे उत्कट क्षण हे खासगी आहेत, त्यात आम्हाला सामील करून घेऊ नकोस. मी तुला विनंती करतोय की रात्रीच्यावेळी तुमचा आवाज कमी ठेवा. कृपया ही गोष्ट ध्यानात ठेव की तुझ्या शेजारच्यांना भिंतीपलिकडचाही आवाज व्यवस्थित ऐकू येतो.’

स्टीफनला ही चिठ्ठी केव्हा मिळाली हे कळू शकलेलं नाहीये, मात्र त्याने म्हटलंय की माझ्या प्रेयसीने सकाळी मला उठवलं आणि चिठ्ठी दाखवली. अज्ञात व्यक्तीने आम्ही उठायच्या आतच दाराखालून ही चिठ्ठी सरकवून ठेवली होती. चिठ्ठी वाचून स्टीफन आणि त्याची प्रेयसी लाजले होते. चिठ्ठी वाचून नंतर मलाहसायलाही आलं असं स्टीफनने म्हटलंय. त्याने ही चिठ्ठी सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर स्टीफनच्या मित्रांनी त्याला शेजारच्यांना इअरप्लग विकत घेऊन दे असा सल्ला दिला. यावर स्टीफन म्हणाला की कोणत्या शेजाऱ्याने ही चिठ्ठी लिहिली आहे ते मला माहिती नाही, आणि जाणून घेण्याचीही इच्छा नाहीये.

आपली प्रतिक्रिया द्या