दरवर्षी 23 जानेवारी हा “पराक्रम दिन” म्हणून साजरा करण्याची केंद्र सरकारने घोषणा

केंद्र सरकारने येत्या 23 जानेवारी 2021 पासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे 125 वे जयंती वर्ष राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुयोग्य पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मरणोत्सवातील कार्यक्रम निश्चित करण्यासाठी आणि त्यांच्यावर देखरेख आणि मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च स्तरीय समिती गठीत केली आहे.

नेताजींनी देशासाठी नि:स्वार्थ भावनेने केलेल्या सेवेचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या स्मरणार्थ केंद्र सरकारने त्यांची जयंती अर्थात 23 जानेवारी हा दिवस “पराक्रम दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील नागरिकांना आणि विशेषत: तरुणांना संकट काळात नेताजींप्रमाणे धैर्याने वागण्याची प्रेरणा मिळावी आणि त्यांच्यामध्ये देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या