गणेश गायतोंडे परततोय, 14 दिवसात काहीतरी मोठे घडणार

सामना प्रतिनिधी । मुंबई

सेक्रेड गेम्स ही नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज खूप गाजली होती. या वेबसिरीजच्या दुसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नेटफ्लिक्सने या वेबसिरीजचा दुसरा भाग येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी नेटफ्लिक्सने सेक्रेड गेम्सबद्दल ट्विट केले आहे. या ट्विटनुसार येत्या 14 दिवसात काहीतरी मोठे घडणार असल्याचे संकेत नेटफ्लिक्सने दिले आहे.

सेक्रेड गेम्स या वेबसिरीज संदर्भातील या ट्विटमुळे चाहत्यांची उत्सुकतता शिगेला पोहोचली आहे. या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी 14 दिवसानंतर काय होणार याचे तर्क लावण्यास सुरुवात केली आहे. काहिंनी सेक्रेड गेम्सचा ट्रेलर लॉन्च होणार असे म्हटले आहे तर काहीनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाणार असल्याचे सांगितले.