प्रतीक्षा संपली, या वेळेला सेक्रेड गेम्स दिसणार नेटफ्लिक्सवर

736

सेक्रेड गेम्सचा दुसरा भाग 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे . गणेश गायतोंडे जिवंत कसा राहिला, मुंबईवर नेमकं काय संकट आहे.  या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. परंतु सेक्रेड गेम्स नेमके किती वाजता नेटफ्लिक्सवर दिसणार याबाबत प्रेक्षकांना काहीच माहिती नव्हती. नेटफ्लिक्सने आता प्रदर्शनाची वेळही जाहीर केली आहे.

15 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजता सेक्रेड गेम्स दिसणार आहे असे नेटफ्लिक्सने जाहीर केले आहे. ट्विटरवर नेटफ्लिक्सने याबाबत म्हटले की आज रात्री 12 वाजता सेक्रेड गेम्स सीजन दोन प्रदर्शित होणार आहे. याचा अर्थ झोपेचे बलिदान द्यावे लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या