हिंदुस्थानच्या स्वप्नांना सुरुंग, हॉकीत पराभवासह विश्वचषकातून बाहेर

16

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हॉकी विश्चषकामध्ये हॉलंडकडून पराभव सहन करावा लागल्याने हिंदुस्थानच्या विश्वविजेतेपदाच्या स्वप्नांना सुरुंग लागला आहे. हॉलंडने उपउपांत्यफेरीत हिंदुस्थानला 1-2 असा गोल फरकाने पराभूत केले. गेल्या 43 वर्षात पहिल्यांदाच हिंदुस्थानला विश्वचषकातून रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. हॉलंडने हिंदुस्थानला पराभूत करत उपांत्यफेरीत धडक दिली आहे.

कलिंगा मैदानावर झालेला हा सामना पाहण्यासाठी तब्बल 15 हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. संपूर्ण खेळादरम्यान चक दे इंडिया, जय हिंद, कम ऑन इंडिया या घोषणांनी मैदान दणाणून गेले होते. परंतु प्रेक्षकांचा तुफान पाठिंबा असताना मैदानावर हिंदुस्थानी खेळाडूंना लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. हिंदुस्थानने 12 व्या मिनिटाला 1-0 आघाडी घेतल्यानंतरही पराभव सहन करावा लागला. हॉलंडकडून 15व्या मिनिटाला आणि 50 व्या मिनिटाला गोल करत विजय मिळवला.

आपली प्रतिक्रिया द्या