जीवनवृक्ष वडाचे अक्षय्य फायदे ..

ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी खास असतो. वटवृक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश हे तीन देव वास करतात. या झाडाची प्रदक्षिणा केल्यास एकाच वेळी तिन्ही देवांची कृपा होते. या दिवशी वडाच्या झाडाला प्रदिक्षणा घालून स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. शास्त्रात वटवृक्षाला मंगळाचा कारक मानले गेले आहे. आपल्या कुंडलीत मंगळ दोष असल्यास वटवृक्षाभोवती प्रदक्षिणा घालाव्या. १०० वर्ष जगण्याचे वरदान लाभलेल्या वडाला आपण फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी पुजतो. पण त्याचे आपल्या कसे फायदे होतात ..

वटवृक्षाच्या झाडाचे फायदे –

१.) वडाचे झाड हे २० तास ऑक्सिजन देते त्याला नियमित प्रदिक्षणा घातल्यास आपले आरोग्य सुधारते.

२) वडाच्या झाडाचा चिक हा दातदुखी, संधीवात व तळपायांच्या भेगांवर फायदेशीर ठरतो.

३) वडाच्या सालीचा काढा हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे. याचे सेवन केल्यास फायदा होतो.

४) सांधेदुखी किंवा पाय मुरगळल्यावर वडाची पाने गरम करुन दुखऱ्या जागी लावल्यास आराम मिळतो.

५) तसेच पावसाळ्यात खाज किंवा पायाला चिखल्या झाल्या असतील तर वडाचे चिक लावावे.

६) वडाच्या पारंब्यांच्या रसाचे सेवन केल्यास ताप नाहीसा होण्यास मदत होते.

७.)अतिसार झाल्यास किंवा पोटदुखत असल्यास कोवळ्या पारंब्याचा रस प्यायल्याने आराम मिळतो.

८) वडाच्या पारंब्या खोबऱ्याच्या तेलात भिजवून केसांना हे तेल लावल्यास केस गळती थांबते व केस दाट होण्यास मदत होते.

९) वडाच्या पानांपासून जेवणासाठी पत्रावळदेखील बनवली जाते