सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी 6 रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या 105 वर

340

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने शतक गाठले आहे. शुक्रवारी 6 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या 105 वर पोहचली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारपर्यंत 99 कोरोनाबाधित रुग्ण होते. त्यात शुक्रवारी 6 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात देवगड तालुक्यातील नाडणमधील 3, वैभववाडी तालुक्यातील कोकिसरेतील 1 तर कणकवली तालुक्यातील कणकवलीमधील 2 रुग्णांचा समावेश आहे. 6 रुग्ण नव्याने आढळल्यानंतर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 105 झाली आहे. आतापर्यंत 2 रुग्णांचा मृत्यू झाला असून एक रुग्ण उपचारसाठी मुंबईला गेला आहे. तर 16 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 86 रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. 105 रुग्णांमध्ये सर्वाधिक कणकवली तालुक्यात 36, मालवणमध्ये 15, कुडाळमध्ये 15, सावंतवाडीत 14, देवगडमध्ये 13, वैभववाडीत 9 तर वेंगुर्ला तालुक्यातील 3 रुग्णांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या