आयपीएलचे नवीन अँथम साँग प्रसारित

4

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘आयपीएल’चा अकरावा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना नवीन अँथम साँग प्रसारित करण्यात आले. यंदा आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क हे स्टार स्पोर्ट्स या वाहिनीकडे आहेत. त्यामुळे क्रीडा प्रसारणात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या या वाहिनीने यंदाच्या अँथममध्येही आपला वेगळेपणा जोपासला आहे. ‘ए देश है वीर जवानों का…’ या सुप्रसिद्ध हिंदी गाण्याच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या हंगामाचे अँथम साँग रचण्यात आलेले आहे.

हिंदी, तामीळ, बंगाली, कन्नड आणि तेलगू या पाच भाषांमध्ये हे गाणे प्रसिद्ध केले जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा चित्रपट दिग्दर्शक डॅन मेस, संगीत दिग्दर्शक राजीव भल्ला, वोकलिस्ट सिद्धार्थ बसरूर यांनी या थीम साँगवर काम केलेले आहे. या आयपीएल अँथम साँगच्या माध्यमातून हिंदुस्थानातील कोटयवधी क्रीडा रसिक पुन्हा एकदा आपल्या आवडत्या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतील, असे बीसीसीआयचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या