परळीत उभी राहीली पंचायत समितीची देखणी इमारत

43

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

परळी शहराच्या वैभवात भर घालणारी अत्याधुनिक सोयी सुविधा असलेली पंचायत समितीची देखणी इमारत सध्या उभी रहात आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाची कार्यालये एकाच छताखाली असणा-या या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.

मंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी परळीच नव्हे तर जिल्हयातील सर्व पंचायत समित्यांच्या नवीन इमारत बांधकामासाठी निधी मंजूर केला होता. परळी पंचायत समितीचा कारभार यापूर्वी आरोग्य खात्याच्या जागेत चालत होता, आता त्याच जागेवर प्रशस्त व अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशी स्वतंत्र इमारत उभी राहत असून त्याचे काम सध्या पूर्णत्वाकडे आहे. ४ कोटी ७६ लाख रुपये प्रशासकीय मान्यता असलेल्या या इमारतीवर आतापर्यंत ३ कोटी ५० लाख ६० हजार इतका खर्च झाला आहे. २५ हजार स्क्वेअर फूट इतके बांधकाम इमारतीचे झाले आहे. तळमजल्यासह तीन मजली बांधकाम असलेल्या या इमारतीत प्रशस्त मिटींग हॉल, सभापती – उपसभापती, गटविकास अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र दालन, सार्वजनिक व महिलांसाठी वेगवेगळे स्वच्छतागृह, आमसभेकरीता स्वतंत्र जागा, पाणीपुरवठा, कृषी, पशूसंवर्धन तसेच जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारी सर्व विभागाची कार्यालये यात असणार आहेत

आपली प्रतिक्रिया द्या