मुंबईच्या रणजी प्रशिक्षकाची निवड जूनच्या पहिल्या आठवड्यात

26

सामना ऑनलाईन । मुंबई

सर्वाधिक वेळा रणजी चॅम्पियन ठरलेल्या मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाची निवड येत्या जूनच्या पहिल्या आठवडय़ात होणार आहे अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांकडून मंगळवारी देण्यात आली. मुंबईतील विविध वयोगटातील संघाच्या प्रशिक्षकाची निवड मंगळवारी झालेल्या बैठकीत करण्यात आली. मात्र मुंबईच्या रणजी संघाच्या प्रशिक्षकाच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. प्रवीण अमरे व समीर दिघे यांच्यामध्ये प्रशिक्षकपदासाठी रस्सीखेच दिसून येत आहे.

पंडित यांना डच्चू

चंद्रकांत पंडित यांना प्रशिक्षकपदावरून काढून टाकण्यात आले असून आता आगामी मोसमात या पदासाठी प्रवीण अमरे व समीर दिघे या माजी कसोटीपटूंमध्ये चुरस लागली आहे. कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते हे पाहणे यावेळी रंजक ठरणार आहे.

मुंबईतील विविध गटांतील प्रशिक्षक खालीलप्रमाणे

१४ वर्षांखालील संघ : संदेश कवळे

१६ वर्षांखालील संघ : विनायक माने

१९ वर्षांखालील संघ : सतीश सामंत

२३ वर्षांखालील संघ : अमित पागनीस

सीनियर महिला गट : अर्पणा कांबळी

१९ वर्षांखालील मुली : जयेश दादरकर

विद्यापीठ, मुले : विनय दांडेकर

विद्यापीठ, मुली : स्वाती पाटील

 

आपली प्रतिक्रिया द्या