कोरोनापाठोपाठ नवे संकट : रशियात कामगारांना बर्ड फ्लू

कोरोना महामारी संपायच्या आधीच आता जगावर नवे संकट येऊ घातले आहे. आतापर्यंत कोंबड्या आणि पक्ष्यांपर्यंत मर्यादीत असलेल्या ‘बर्ड फ्लू’चा (एच 5 एन 8) माणसालाही धोका निर्माण झाला आहे. पक्ष्यांपासून बर्ड फ्लूचा माणसाला संसर्ग झाल्याची घटना रशियात घडली आहे. रशियात पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या कामगारांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाला आहे. माणसाला बर्ड फ्लूची लागण होण्याची ही जगातील पहिलीच घटना असून या घटनेची माहिती जागतिक आरोग्य संघटनेलाही देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनापाठोपाठ आणखी एक नवे संकट उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशियासह युरोप, चीन, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये बर्ड फ्लू’चा (एच 5 एन 8) उद्रेक झाला आहे. मात्र केवळ पोल्ट्री कोंबड्यांना या विषाणूचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत होते, मात्र आता माणसालाही याचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या