नवी दिल्लीत बीसीसीआयचा जीवघेणा खेळ

310
New Delhi: A view of Arun Jaitley Stadium, a day before India-Bangladesh T20 match, in New Delhi, Saturday, Nov. 2, 2019. (PTI Photo/Ravi Choudhary)(PTI11_2_2019_000028B)

नवी दिल्लीतील टी-20 लढतीमुळे नवनिर्वाचित अध्यक्ष सौरभ गांगुलीवर चोहोबाजूंनी टीका होत असली तरी या वर्षातील मालिकांचे वेळापत्रक याआधीच्या बीसीसीआय पदाधिकाऱयांकडून निश्चित करण्यात आले आहे. ऐनवेळी आम्हाला यामध्ये बदल करता येणार नाही. तिकिटेही विकली गेली आहेत. लढतीच्या टीव्हीवरील प्रक्षेपणासाठी सर्व काही सज्ज आहे, असे सौरभ गांगुलीने स्पष्ट करीत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पुढच्या वर्षापासून दिवाळीनंतर अर्थातच हिवाळ्यात हिंदुस्थानच्या उत्तर विभागात सामने खेळवणार नसल्याचेही सौरभ गांगुली यावेळी म्हणाला.

  • सेंट्रल झोन प्रशासनाने 9 अतिरिक्त पाण्याचे टँकर आणि 12 वॉटर स्प्रिंकल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. साफसफाईच्या वेळी धूळ उडू नये म्हणून 10 मेकॅनिकल मशीन तैनात ठेवल्या आहेत. पालिकेने या परिसरात पाण्याचा शिडकावा करण्यास सुरुवातही केली आहे. विशेष सफाई अभियानासाठी 35 सफाई कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

मास्क लावून सराव

हिंदुस्थानी संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने उद्याच्या लढतीत खेळण्यासाठी आम्ही तयार असल्याचे सौरभ गांगुलीला सांगितल्यामुळे ही लढत रद्द होणार नाही हे निश्चित झाले, पण बांगलादेशच्या बहुतांशी खेळाडूंनी नवी दिल्लीतील स्टेडियममध्ये मास्क लावूनच सराव करणे पसंत केले. सामन्यादरम्यानही खेळाडू मास्क लावून मैदानात दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.

स्टॅण्ड रिकामेच असणार…

वातावरण दूषित झाल्यामुळे नवी दिल्लीतील जनता घरी बसूनच सामना पाहणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे उद्याच्या लढतीसाठी स्टेडियममधील बहुतांशी स्टॅण्ड रिकामे असतील यात वाद नाही.

  • फिरोजशहा कोटला मैदानाचे हे क्षेत्र दक्षिण दिल्ली पालिकेच्या अंतर्गत येते. या क्षेत्राला झीरो टॉलरन्स झोन घोषित करण्यात आले आहे, असे दक्षिण दिल्ली पालिकेचे आयुक्त ज्ञानेश भारती यांनी सांगितले. मैदानातील आणि आसपासच्या भागातील हवा आणि प्रदूषणाच्या स्तरावर नियंत्रण ठेवण्यासाठी खास उपाययोजना करण्यात येत आहे. प्रदूषणावर नजर ठेवण्यासाठी खास गस्ती पथकांची स्थापना केली आहे. जेणेकरून नियमभंग करणाऱयांविरुद्ध कारवाई करता येईल, असेही ते पुढे म्हणाले.
  • रविवारी पहिली टी-20 लढत हिंदुस्थान-बांगलादेश नवी दिल्ली, सायं 7 वाजता
आपली प्रतिक्रिया द्या