जम्मू-कश्मीरमध्ये 15 वर्ष वास्तव्य करणाऱ्यास मिळणार ‘डोमीसाईल’ सर्टिफिकेट

872

जम्मू-कश्मीरच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने जम्मू-कश्मीर या केंद्रशासित भागासाठी नवीन नियम जारी केली आहेत. जम्मू-कश्मीर जम्मू कश्मीर पुनर्गठन आदेश 2020 मधील शिक्षण सेक्शन 3 ए नुसार आता अधिवसाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यामुळे आता पंधरा वर्ष जम्मू-कश्मीर या राज्यात निवासी असलेल्या व्यक्तीला अधिवसाचे अधिकारी प्राप्त होणार आहे. तसेच ज्या व्यक्तीने जम्मू-कश्मीर मध्ये सात वर्ष शिक्षण घेतले आहे किंवा दहावी आणि बारावी परीक्षा ची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत त्यांना जम्मू-कश्मीरचे अधिवसाचे अधिकार मिळणार आहेत.

याआधी म्हणजेच 5 ऑगस्ट 2019 आधी जम्मू-कश्मीरच्या संदर्भातील 35 ए या कलमानुसार जम्मू आणि कश्मीरच्या स्वतंत्र संविधानाप्रमाणे अधिवासाचे सर्टिफिकेट देण्यात येत होते. मात्र 5 ऑगस्ट 2019 रोजी 35 ए हटवल्यानंतर जम्मू-कश्मीर केंद्रशासित भाग म्हणून जाहीर करण्यात आला त्यामुळे आता नव्या नियमानुसार जम्मू-कश्मीरमध्ये राहण्याचे अधिकार प्राप्त होणार आहेत.

तसेच नव्या नियमानुसार म्हणजेच जम्मू कश्मीर पुनर्गठन आदेश 2020 मधील 3 ए नुसार जम्मू-कश्मीर मध्ये हे सरकारी कार्यालय सरकारशी निगडीत कंपन्या, सरकारी बँका यामध्ये दहा वर्षापासून कार्यरत असलेल्या व्यक्तींना अधिवासाचा अधिकार मिळणार आहेत. तसेच वरील नियमानुसार या व्यक्तींच्या मुलांना देखील अधिवासाचे अधिकार प्राप्त होतील.

आपली प्रतिक्रिया द्या