
सामना ऑनलाईन । मुंबई
………………………………………………………………………………………..
- बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तीमत्व ३ तासांच्या चित्रपटात सामावणे कठीण आहे त्यामुळे ८-१० भागांची चित्रपटांची मालिका तयार करा, बाळासाहेबांवर वेबसिरिज करा!: अमिताभ बच्चन
- कुली सिनेमाच्या शुटींगदरम्यान जखमी झाल्यानंतर आपल्याला मुंबईत आणलं गेलं. पण विमानतळावरून एकही अॅम्ब्युलन्स मिळत नव्हती. त्यावेळी शिवसेनेची अॅम्ब्युलन्स मिळाली आणि माझे प्राण वाचलेः अभिताभ बच्चन
- पुढच्या पिढ्यांसाठी हा चित्रपट मार्गदर्शक ठरेलः उद्धव ठाकरे
- हा इतिहास घडविणाऱ्या महापुरुषावरील चित्रपट – उद्धव ठाकरे
- हा हिरो-हिरोईनचा चित्रपट नाही, सामान्य माणसाला हिरो करणाऱ्या बाळासाहेबांवरील चित्रपट आहे – उद्धव ठाकरे
- शिवसेनाप्रमुखांवर चित्रपट काढण्याचा निर्णय हे शिवधनुष्य उचलण्यासारखं: उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला पत्रकार म्हणून घडवले – संजय राऊत
- मराठी आणि हिंदी भाषेत चित्रपट प्रदर्शित होणार
- चित्रिकरण ८० दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन
- मार्च -फेब्रुवारी २०१८पासून चित्रिकरण सुरू होणार. २३ जानेवारी, २०१९ रोजी चित्रपट प्रदर्शित होणार.
- नवाजुद्दीन सिद्दकी साकारणार हिंदुह्रदयसम्राटांची भूमिका
- अभिजित पानसे करणार शिवसेनाप्रमुखांवरील चित्रपटाचे दिग्दर्शन
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महानायक अमिताभ बच्चन आणि चित्रपट निर्माते शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची उपस्थिती.
- लाखो-करोडो जनतेने आपल्या हृदयात दैवत म्हणून पुजलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील भव्य चित्रपटाच्या घोषणा सोहळ्याला सुरुवात.
- केसरी टुर्सचे सर्वेसर्वा केसरी पाटील, प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर आणि हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत कार्यक्रमस्थळी आले.
- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, मुंबईचे महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त देवेन भारती कार्यक्रमस्थळी आले.
- शिवसेना नेते, खासदार आणि चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांचे कार्यक्रमस्थळी आगमन
- शिवसेनाप्रमुखांवरील भव्य चित्रपटाची घोषणा थोड्याच वेळात होणार…
शिवसेनाप्रमुखांवरील भव्य चित्रपटाची आज घोषणा, बाळासाहेब यांच्या भूमिकेत कोण?
आपली प्रतिक्रिया द्या