जानेवारीअखेर लष्कराचे पूल तयार

प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

एल्फिन्स्टन रोड पुलावरील चेंगराचेंगरीनंतर अखेर जागे झालेले रेल्वे मंत्रालय मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या सहकार्याने (एमआरव्हीसी) उपनगरीय मार्गावर एवूैण ३० पादचारी पुलांची उभारणी करणार आहे. त्यातील काही पुलांसाठी एक वर्ष आणि १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. एमआरव्हीसी त्यासाठी ९२ कोटी रुपये खर्च करणार आहे. एल्फिन्स्टन रोड, आंबिवली, करी रोड येथील लष्करामार्पैत बांधले जाणारे पादचारी पूल जानेवारीअखेरपर्यंत सेवेत येणार आहेत. नव्या वर्षात मध्य रेल्वेवर १५ तर पश्चिम रेल्वेवर १२ नवे पादचारी पूल बांधण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेवर पुढील वर्षात नवीन ३१८ एटीव्हीएम मशीन्स येतील. त्याचप्रमाणे एका वर्षात ६६ सरकते जिने बसविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवाशांसाठी ३३ लिफ्टचाही समावेश करण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वेवरील पादचारी पूल

मरीन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल (दोन), सांताव्रुैझ, अंधेरी, गोरेगाव, नायगाव, वसई, नालासोपारा, ग्रँट रोड, महालक्ष्मी, माहीम, विलेपार्ले, जोगेश्वरी.
पश्चिम रेल्वे २४५ कोटी रुपये खर्च करणार
पश्चिम रेल्वे चर्चगेट ते विरारपर्यंत १२ नवीन पादचारी पूल उभारणार आहे. त्यात १७ पुलांची पुनर्बांधणी होणार आहे. त्यात मुंबई पालिकेच्या सहाय्याने सात आणि रेल्वेच्या वतीने २९ अशा एकूण ३६ पुलांसाठी २४५ कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

मध्य-हार्बरचे पूल

दादर, मुलुंड, विक्रोळी, टिटवाळा, आटगाव, उल्हासनगर, कसारा, आंबिवली, वासिंद, वडाळा, गोवंडी, टिळकनगर, करी रोड, चिंचपोकळी.