चीनमध्ये झपाट्याने पसरतेय नपुंसक बनवणारे संक्रमण…वाचा सविस्तर…

जगभरात कोरोनाचे थैमान सुरू आहे. चीनमधून हा घातक व्हायरस जगभरात पसरला आहे. आता चीनमध्ये एका नव्या रोगाच्या संक्रमणामुळे चिंता वाढली आहे. चीनमध्ये हे संक्रमण झपाट्याने पसरत असून ते बॅक्टेरियामुळे (जिवाणू) पसरत आहे. या रोगामुळे नपुंसकता येत असल्याने या रोगाच्या संक्रमणामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. चीनच्या ग्रासु प्रातांतील लान्झोउ शहरात 3,245 जणांना या रोगाचे संक्रमण झाले आहे. तसेच याचे संक्रमण झपाट्याने पसरत आहे. जिवाणूमुळे होणाऱ्या या संक्रमणाला ब्रूसेलॉसिस नाव देण्यात आले आहे.

जिवाणूमुळे होणारे हे संक्रमण प्राण्यांच्या संपर्कात आल्याने होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. मात्र, गेल्यावर्षी एका बायोफार्मास्यूटिकल कंपनीतून हा घातक जिवाणू बाहेर पडल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला आहे. ब्रूसेलॉसिस नावाच्या या आजाराला माल्टा फिवर असेही म्हणतात. ब्रुसेना प्रजातीतील जिवाणूमुळे हा रोग पसरतो. डुक्कर,बकरी, कुत्रे आणि मेंढी या प्राण्यांच्या संपर्कात आल्याने हा रोग पसरत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. मात्र, माणसांमधून माणसांमध्ये याचे संक्रमण होते किंवा नाही, याबाबतची नेमकी माहिती मिळालेली नाही. मात्र, असा धोका कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दूध न उकळता पिणे, दूधाचे पदार्थ किंवा संक्रमण झालेले पदार्थ खाल्ल्याने हा रोग झपाट्याने पसरत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. त्याचप्रमाणे हवेतील संक्रमण पसरवणाऱ्या घटकांमुळेही हा रोग फैलावत आहे.

कोरोनाप्रमाणेच या रोगाची लक्षणे उशीरा दिसतात किंवा दिसून येत नाही. याची लक्षणे फ्लूसारखे असतात. ताप येणे, अशक्तपणा, डोकेदुखी, अंगदुखी आणि थकवा येणे ही या रोगाची काही प्रमुख लक्षणे आहेत. या रोगामुळे नपुसंकता येत असल्याने या रोगाची दहशत निर्माण झाली आहे. संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात आल्याने हा रोग होत असल्याने प्राण्यांच्या संपर्कात येण्यापूर्वी योग्य ती काळजी घ्यावी. दूध नेहमी उकळून घ्यावे. दूधापासून बनवलेले पदार्थ खाताना काळजी घ्यावी. या रोगाचे जिवाणू हवेतून पसरण्याचा धोका असल्याने मास्कचा वापर करावा. प्राण्यांच्या संपर्कात जाताना मास्क वापरणे गरजेचे आहे. चीनमध्ये दूधापासून बनवलेल्या पदार्थांमुळे आणि हवेतून हा रोग झपाट्याने पसरत आहे. या रोगामुळे अद्याप एकही मृत्यू झालेला नाही. मात्र, या रोगामुळे नपुसंकता येत असल्याने रोगाची दहशत पसरली आहे. तसेच या रोगाची लक्षणे दिसून येत नसल्याने संक्रमितांची संख्या जास्त असण्याची भीतीही वर्तवण्यात येत आहे. कोरोनानंतर आता हा नवा बॅक्टेरियाजन्य आजार चीनमधूनच जगभरात पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या