‘आम्ही आणि आमचे बाप!’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

299

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील विनोदी अभिनेते आनंद इंगळे, अजित परब, अतुल परचुरे आणि पुष्कर श्रोत्री हे जर मराठी रंगभूमीवर एकत्र आले तर अक्षरश: धम्माल होईल. या चारही कलाकारांनी प्रेक्षकांचे प्रत्येक चित्रपट-मालिका-नाटक या तीनही माध्यमांतून मनोरंजन केलं आहे. आता हे कलाकार ‘आम्ही आणि आमचे बाप’ या मराठी नाटकात एकत्र दिसणार आहेत. विशेष म्हणजे, संगीतकार आणि गायक असलेला अजित परबही या नाटकातून अभिनेता म्हणून व्यावसायिक नाटकात दिसणार आहे.

आदि कल्चरटेनमेंट आणि अष्टविनायक निर्मित ‘आम्ही आणि आमचे बाप!’ या नाटकाचे संकलन आणि दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केलं आहे. पु.ल. आणि आचार्य अत्रे यांच्या निवडक कलाकृतींवर आधारित या नाटकाची निर्मिती मयुर रानडे, दिलीप जाधव आणि श्रीपाद पद्माकर यांनी केली आहे. नेपथ्य आणि वेशभूषेची जबाबदारी राजन भिसे यांनी पेलली आहे.
१५ जुलै, शनिवारी रोजी ‘आम्ही आणि आमचे बाप’ या नाटकाचा शुभारंभ होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या