छोट्यांसाठी ‘टिपूजीच्या पोटलीतल्या गोष्टी’

99

सामना ऑनलाईन । मुंबई

यंदाची उन्हाळ्याची सुट्टी अधिकच रंगतदार बनविण्याकरिता ‘टिपूजीच्या पोटलीतल्या गोष्टी’ हे बालनाट्य थिएटर कोलाज निर्मित आणि अपूर्वा प्रोडक्शन सादर करत आहेत. 11 मे, रोजी सकाळी 10.00 वाजता राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे या बालनाट्याचा शुभारंभ प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. या कलाकृतीची मूळ कथा संकल्पना आणि दिग्दर्शन पल्लवी वाघ-केळकर यांनी केले आहे. नेपथ्य सचिन गावकर, संगीत  अनुराग गोडबोले, प्रकाशयोजना योगेश केळकर, रंगभूषा उल्हेश खंदारे यांनी केले आहे. 26 बालकांचा या नाटकात समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या