नवऱ्याला स्तनपान देण्याचे महिलेने कारण सांगितले, 1.2 कोटी लोकांनी पाहिला व्हिडीओ

बाळाला स्तनपान देणाऱ्या महिलेने आपण आपल्या नवऱ्यालाही स्तनपान देत असल्याचं सांगितलं आहे. जेनिफर असं या महिलेचं नाव असून तिने एक व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ टीकटॉकवर अपलोड करण्यात आला असून तो आतापर्यंत 1.2 कोटी लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओमध्ये जेनिफरने आपण नवऱ्यालाही स्तनपान का देत होतो याची माहिती दिली आहे. लग्न करत असताना किंवा मुलाच्या जन्मावेळी काही गोष्टी अशा असतात ज्यासाठी आपली तयारीच नसते, आणि ही त्यातलीच एक गोष्ट असल्याचं जेनिफरने म्हटलं आहे.

जेनिफरने व्हिडीओमध्ये म्हटलंय की काही दिवसांपासून तिच्या उजव्या स्तनामध्ये तिला वेदना जाणवत होत्या. दुधाच्या गाठींमुळे त्या वेदना होत असाव्यात असा तिला अंदाज आला होता. ही गोष्ट सामान्य असली तर जेनिफरला या गाठींमुळे ताप यायला लागला होता. तापावर तिने औषध घेतलं होतं, मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नव्हता. जेनिफरने वेगवेगळे उपाय करून पाहिले मात्र तिला आराम मिळत नव्हता. सगळे उपाय करून थकल्यानंतर जेनिफरने गुगलवर सर्च करून सापडलेला उपाय करायचं ठरवलं होतं. तुमच्या साथीदाराने स्तनपान केल्यास या गाठी मोकळ्या होण्यास मदत होते असं गुगलवरील माहितीमध्ये म्हटलं होतं.

आपल्या नवऱ्याने स्तनपान करावं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती आणि नवराही त्यासाठी तयार नव्हता असं जेनिफरने सांगितलं आहे. उत्तेजनेसाठी किंवा लैंगिक सुख मिळवण्यासाठी मी हे करत होते हे म्हणणं चुकीचं ठरेल असंही जेनिफरने म्हटलंय. स्तनामध्ये गाठी झाल्याने जेनिफरच्या मुलीला दूध मिळत नव्हतं, ज्यामुळे जेनिफरने तिच्या नवऱ्याला स्तनपान देण्याचा निर्णय घेतला. जेनिफरने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलंय की हा उपाय यशस्वी ठरला आणि त्यांची समस्या दूर झाली.