नवी मुंबईत मसाला, धान्य मार्केटमध्ये कडकडीत बंद

29

सामना प्रतिनिधी, मुंबई

ब्रॅण्ड आणि पॅकिंग असा कोणताही निकष न लावता सरसकट जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी हटविण्यात यावी या मागणीसाठी एपीएमसीच्या मसाला आणि धान्य मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आज कडकडीत बंद पाळला. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल आज ठप्प झाली.

केंद्र सरकारने जीएसटीमधून शेतमालाला वगळले असले तरी ब्रॅण्डिंग आणि पॅकिंग करून विकल्या जाणाऱ्या शेतमालाला मात्र पाच टक्के जीएसटी लावला आहे. याला नवी मुंबईसह महाराष्ट्रातील सर्वच व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. ब्रॅण्डिंग आणि पॅकिंग केलेल्या शेतमालाला जीएसटी लावू नये यासाठी आज व्यापाऱ्यांनी दुसऱ्यांदा बंद पाळला. जर सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर व्यापारी आपले आंदोलन आणखी तीव्र करणार आहेत, अशी माहिती नवी मुंबई मर्चंट चेंबरचे अध्यक्ष कीर्ती राणा यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या