65 हजार चौरस मीटर जागेवर उभे राहणार नवे संसद भवन

parliament

राजधानी दिल्लीतील संसद भवजवळच नके संसद भवन उभे राहणार आहे. 65 हजार चौरस मीटर जागेत उभारल्या जाणाऱया या संसद भवनाच्या बांधकामासाठी निविदा भरण्यास तीन कंपन्या पात्र ठरल्या आहेत. त्यात लार्सन ऍन्ड टूब्रो, टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि शापूरजी पालनजी ऍन्ड कंपनीचा समावेश आहे.

केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने ही माहिती दिली. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी सात कंपन्यांनी पूर्व-पात्रता निविदा दाखल केल्या होत्या. उत्तर प्रदेश राजकीय निर्माण निगम लिमिटेडनेही निविदा दाखल केली होती. त्यातून तीन कंपन्यांची पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. संसद भवनाच्या परिसरातील 118 क्रमांकाचा भूखंड नव्या भवनासाठी निवडला गेला आहे.

असे असेल नवे संसद भवन…
– सध्याच्या संसद भवनाजवळच उभी राहणार इमारत
– बांधकामाचा अंदाजित खर्च 889 कोटी रुपये
– सिमेंट काँक्रीट प्रेम्सचे स्ट्रक्चर
– जमिनीपासून 1.8 मीटर उंच पाया
– 16921 चौरस मीटरचे तळघर
– इमारतीला तळमजला धरून दोन मजले

आपली प्रतिक्रिया द्या