आता डोंबिवलीकरांना पासपोर्टसाठी ठाण्याला जावं लागणार नाही

20

सामना ऑनलाईन, ठाणे

पासपोर्ट मिळवण्यासाठी ठाण्यापर्यंत धाव घ्यावी लागणाऱ्या लाखो नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. डोंबिवलीमध्ये लवकरच पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य होऊ शकलं आहे. हिंदुस्थानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री यांनी खासदार शिंदे यांना पत्र पाठवून डोंबिवलीमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात येईल असं कळवलं आहे.

महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर अशा केवळ चार ठिकाणी पासपोर्ट कार्यालये आहेत. ठाण्याअंतर्गत मुंबईवगळता एमएमआर प्रदेश, नवी मुंबई, रायगड, तसेच नाशिकसह उत्तर महाराष्ट्र इतका मोठा परिसर येतो. साहजिकच आहे की त्यामुळे ठाणे कार्यालयावर कामाचा जबरदस्त ताण पडतोय.

ठाणे कार्यालयाअंतर्गत सध्या केवळ तीन पासपोर्ट सेवा केंद्रे कार्यरत आहेत. यातील एक केंद्र ठाण्यात, एक मुंबईला आणि एक नाशिक इथे आहे. त्यामुळे ठाण्याच्या पुढील डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर या विस्तृत परिसरातील लाखो नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळत त्यांना रेल्वेने ठाण्यापर्यंत पोहोचावं लागतं. पासपोर्ट ऑफीस हे स्टेशनपासून लांब असल्याने ते गाठता गाठता त्यांची दमछाक होते. ठाण्याच्या सेवा केंद्रावर जबरदस्त ताण असल्याने अपॉइंटमेंट मिळायलाही वेळ लागतो. यामुळेच डोंबिवलीत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात यावं अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे  यांनी १८ एप्रिल रोजी केली होती.

कल्याण लोकसभा मतदारसंघाची लोकसंख्या तब्बल २२ लाखांच्या पुढे असून, डोंबिवलीत पासपोर्ट केंद्र सुरू झाल्यास त्याचा फायदा या नागरिकांना होऊ शकेल

आपली प्रतिक्रिया द्या