मुंबई सेंट्रल ते त्र्यंबकेश्वर, धावणार एसटीची ‘शिवशाही’

41

सामना ऑनलाईन । मुंबई

एसटी महामंडळाने माफक तिकीट दरात वातानुकूलित प्रवास घडविण्यासाठी आणलेल्या ‘शिवशाही’ बसेसना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आता मुंबई सेंट्रल ते त्र्यंबकेश्वर अशा मार्गावर ‘शिवशाही’च्या फेऱ्या होणार आहेत. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या वातानुकूलित ‘शिवशाही’ बसचा विस्तार हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे.

सर्वसामान्यांना परवडणारी ही शिवशाहीची सेवा आतापर्यंत मुंबई-रत्नागिरी, पुणे-लातूर, पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर तसेच रत्नागिरी-कोल्हापूर व मुंबई अलिबाग या मार्गावर सुरू करण्यात आली आहे. नव्याने सुरू होणाऱ्या मुंबई सेंट्रल ते त्र्यंबकेश्वर या शिवशाही बसचे तिकीट प्रौढांसाठी ३३८ रुपये तर बालकासाठी १७० रुपये आहे. तर मुंबई ते नाशिक प्रवासासाठी प्रौढांसाठी २९१ रुपये तर बालकांसाठी १४७ रुपये आकारण्यात येणार आहेत.

ही बस मुंबई सेंट्रलवरून सकाळी ६ वा. आणि ९.४५ वा. सुटणार आहे, तर परतीच्या प्रवासासाठी त्र्यंबकेश्वरहून दुपारी २.३० वा. आणि सायं. ७.१५ वा. ही बस सुटणार आहे. तसेच ही बस दादर, शीव, कुर्ला-नेहरूनगर, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड-म्हाडा कॉलनी, ठाणे-खोपट, कल्याण फाटा, शहापूर, नाशिक सीबीएस या मार्गे धावणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या