‘काव्यांजली’मध्ये प्रसाद जवादेची एण्ट्री!

कलर्स मराठीवर सोमवारपासून ‘काव्यांजली-सखी सावली’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. मालिकेमध्ये प्रेक्षकांना दोन बहिणींची प्रेमळ गोष्ट बघायला मिळणार आहे. मालिकेत ‘बिग बॉस फेम’ प्रसाद जवादे याची एण्ट्री होणार आहे.

 भूमिकेबद्दल बोलताना प्रसाद म्हणाला, ‘बिग बॉस मराठी’मध्ये मला प्रेक्षकांकडून जे प्रेम मिळाले ते मी कधीच विसरू शकणार नाही. खरं तर या प्रेमाची परतफेड करताच येणार नाही, पण मी खूप विचार केला की, याचे एक रिटर्न गिफ्ट मी प्रेक्षकांना कसे देऊ शकतो आणि तेव्हाच मला कलर्स मराठीकडून ‘काव्यांजली-सखी सावली’ या मालिकेसाठी ‘प्रीतम’च्या भूमिकेसाठी विचारणा झाली. ‘प्रीतम’ या पात्राबद्दल ऐकताच मी ठरवले की, हेच असेल माझ्या चाहत्यांसाठी एक छान रिटर्न गिफ्ट. ही मालिका कलर्स मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता पाहता येईल.