‘शिवालय’च्या नव्या वास्तूचे आज उद्घाटन

22

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेनेचे राज्य संपर्क कार्यालय शिवालयच्या नव्या वास्तूचे उद्घाटन उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नरीमन पॉइंट येथील मादाम कामा मार्गावरील एअर इंडिया इमारतीशेजारील बंगला क्रमांक क-4 येथे हे नवे शिवालय असणार आहे.

शिवालय हे नरीमन पॉइंट येथील फ्री प्रेस जर्नल मार्गावरील बॅरेक नंबर 7 येथे होते, परंतु तेथून मेट्रो रेल्वेचा मार्ग जाणार असल्याने आता वरील नव्या वास्तूत शिवालयचा कारभार सुरू राहणार आहे. उद्या, 5 जुलै रोजी दुपारी 1 वाजता या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी शिवसेनेचे नेते, उपनेते, मंत्री, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या