कतरिना आणि रणबीर फिरताहेत ‘झुमरीतलैय्या’

69

सामना ऑनलाईन । मुंबई

बातमी वाचून आश्चर्यचकित झाला असाल ना.. कतरिना आणि रणबीर एकत्र ‘झुमरीतलैय्या’ला काय करताहेत? पण ते खरोखर फिरायला गेले नसून कतरिना आणि रणबीरच्या आगामी जग्गा जासूसमधलं नवीन गाणं ‘झुमरीतलैय्या’ प्रदर्शित झालं आहे. निलेश मिश्रा यांनी हे गाणं लिहिलं असून संगीतकार प्रीतम यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. अरिजित सिंग आणि मोहन कनन या दोघांनी हे गाणं स्वरबद्ध केलं आहे. अनुराग बासू दिग्दर्शित जग्गा जासूस हा चित्रपट येत्या १४ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.

पाहा झुमरीतलैय्या या गाण्याचा व्हिडिओ-

आपली प्रतिक्रिया द्या