ललित आणि नेहा म्हणताहेत.. क्षण मोहरे…

सामना ऑनलाईन । मुंबई

नेहा महाजन आणि ललित प्रभाकर यांचा आगामी चित्रपट टीटीएमएम (तुझं तू माझं मी) मधील ‘क्षण मोहरे’ हे पहिलं गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं. हे गाणं रोहित राऊत आणि ‘द व्हॉइस इंडिया’ फेम श्रीनिधी घटाटे यांनी स्वरबद्ध केलं आहे. क्षितिज पटवर्धन यांनी हे गीत लिहिलं असून, पंकज पडघन यांनी ते संगीतबद्ध केलं आहे.

ललित आणि नेहाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल. हे गाणं गोव्यासारख्या रम्य ठिकाणी चित्रीत करण्यात आलं आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि वैशाली एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि कुलदीप जाधव दिग्दर्शित TTMM (तुझं तू माझं मी) हा चित्रपट १६ जूनला प्रदर्शित होणार आहे.

पाहा क्षण मोहरे हे गीत-

आपली प्रतिक्रिया द्या